सेकंडरी स्कूल अॕण्ड ज्युनि. काॕलेज , भिलवडी येथे भूगोल प्रज्ञा शोध केंद्र , मुंबई यांच्यावतीने घेतली जाणारी भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा घेतली गेली. या परीक्षेस इ. ९वी, १०वी, व १२वी कला व शास्त्र मधील एकूण २१५ विद्यार्थी बसले होते . इ.१०वी व इ.१२वी बोर्ड परीक्षेस उपयुक्त असणारी ही परीक्षा गेली सात वर्षापासून घेतली जाते. या परीक्षेचे उत्कृष्ट संयोजन माध्यमिक विभागाच्या भूगोल शिक्षिका सौ.आर.झेड. तांबोळी व उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक एम. एस. पुजारी यांनी केले .सदर परीक्षा घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एम. मन्वाचार , उपमुख्याध्यापक श्री एस.एन.कुलकर्णी , पर्यवेक्षक श्री एस.एल.माने व सर्व भूगोल शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.