Sanvad News ज्ञान प्रबोधनी विद्यालय मिरज येथे क्रीडा स्पर्धा.

ज्ञान प्रबोधनी विद्यालय मिरज येथे क्रीडा स्पर्धा.


ज्ञान प्रबोधनी विद्यालय व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहमय वातावरणात पार पडल्या.शालेय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन अँटी करप्शनचे सब इनिस्पेक्टर प्रशांत चौगुले साहेब यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे,संस्थेच्या सचिव व सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. वनखंडे मॅडम,मुख्याध्यापिका सौ. सविता पाटील, प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता यादव, ज्येष्ठ शिक्षक संतोष जाधव क्रीडाशिक्षक विजय सूर्यवंशी आदींसह सर्व स्टाफ उपस्थित होता.विविध क्रीडा प्रकारात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या क्रीडा स्पर्धा तीन दिवस उत्साहाने पार पडल्या.

To Top