Sanvad News हसणारी माणस खऱ्या अर्थाने पुण्यवान असतात:-हास्यकवी बंडा जोशी; बुरुंगवाडी येथील क्षितिज प्रायमरी स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात

हसणारी माणस खऱ्या अर्थाने पुण्यवान असतात:-हास्यकवी बंडा जोशी; बुरुंगवाडी येथील क्षितिज प्रायमरी स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात


  खळखळून हसणारी माणसे खऱ्या अर्थाने पुण्यवान असतात,तर जे लोकांना हसवितात त्यांच्यासाठी परमेश्वर प्रार्थना करीत असतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हास्यकवी व एकपात्री कलावंत बंडा जोशी यांनी केले.
सिद्धविनायक शिक्षण संस्थेच्या बुरुंगवाडी ता.पलूस येथील क्षितिज प्रायमरी स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रमेश हजारे होते.

             प्रारंभी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते क्षितिज फेस्ट २०२० च्या फलकाचे अनावरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळी, हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
             यापुढे बोलताना बंडा जोशी म्हणाले की,तणावमुक्त जीवन जगण्यासाठी हास्य हे एकमेव औषध आहे.क्षितिज प्रायमरी स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने सर्वांगिण विकास होत आहे.त्यासाठी सुनिल जाधव व सौ.वनिता जाधव यांच्यासह सर्व शिक्षक स्टाफ देत असलेले योगदान अनमोल असे आहे.यावेळी त्यांनी सादर केलेल्या "हास्यपंचमी" या एकपात्री प्रयोगास उपस्थित रसिकांकडून भरभरून असा प्रतिसाद मिळाला.


                    कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश हजारे म्हणाले की,नियोजनबद्ध काम केल्यास शालेय जीवनात निश्चित यश प्राप्त होईल.कोणतेही काम हलके नसते..काम करण्याची लाज बाळगू नका,कोणतेही काम करा ते अत्युच्च करा, असे आवाहन ही केले.
                  संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सुनिल जाधव यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त करीत संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमा विषयी मार्गदर्शन केले.पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिलवडी व परिसरातील विविध वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांचा सुनिल जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेच्या कार्यवाह सौ.वनिता जाधव,मार्गदर्शक बी.पी.जाधव, साहित्यिक विजय जाधव,माणिकचंद देसाई, अशोक साळुंखे,काशिनाथ कुंभार,प्राचार्या स्वाती पाटील,सरपंच संजय माळी,सुनिल माळी,मनोज कोळेकर,दत्तात्रय चव्हाण,बजरंग जाधव,बाळासाहेब जाधव,संजय जाधव, अजित जाधव आदी मांन्यवरासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
                    प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली जाधव यांनी,मान्यवरांचे स्वागत निशांत कोळेकर यांनी,सूत्रसंचालन शिल्पा मगदूम,स्वाती मोकाशी यांनी, तर भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले.
To Top