जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक ता.तासगाव या शाळेतील छत्रपती संभाजी महाराज कब पथकातील तीन विद्यार्थ्यांना सुवर्णबाण हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.शाळेतील सार्थक नितीन काळबागे,हर्षवर्धन संतोष सावंत व प्रज्वल रवींद्र माने या विद्यार्थ्यांची सुवर्णबाण पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सुवर्णबाण हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी तासगाव तालुक्यातील निंबळक ही एकमेव जिल्हा परिषद शाळा आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना
कबमास्टर श्री. रवींद्र सुबराव माने यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी सर्व कब, कबमास्टर, व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ, विद्यार्थी व पालक यांचे शिक्षक संघ परिवार सांगली तसेच पालक व ग्रामस्थवर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
आपल्या विद्यालयाचे उपक्रम व कार्यक्रम आम्ही प्रसिद्ध करू.टाईप केलेला मजकूर व आकर्षक फोटो
पुढील मेलवर पाठवा.
info.eschooltimes@gmail.com