Sanvad News तरच देश महासत्ता बनेल:- युवा व्याख्याते वसंत हंकारे; बुरुंगवाडीत क्षितिज फेस्ट उत्साहात संपन्न..

तरच देश महासत्ता बनेल:- युवा व्याख्याते वसंत हंकारे; बुरुंगवाडीत क्षितिज फेस्ट उत्साहात संपन्न..

              

मुल हीच पालकांची खरी संपत्ती आहे, त्यासाठी आईने जिजाऊ व सावित्री बनले पाहिजे.घराघरातील मुलगा चारित्र्यवान माणूस बनला तरच देश महासत्ता बनेल असे प्रतिपादन युवा व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.सिद्ध विनायक शिक्षण संस्थेच्या बुरुंगवाडी ता. पलूस येथील क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन या सैनिक पॅटर्न निवासी संकुलाच्या वतीने आयोजित क्षितिज फेस्ट २०२० या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पंडीत विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुहास निकम होते.


 जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता कृष्णात शिंदे यांच्या हस्ते रांगोळी, चित्रकला,हस्तकला,हस्ताक्षर व विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन या सैनिक पॅटर्न निवासी शाळेच्या  कुशल व्यवस्थापनामुळे गुणवंत व सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडत असल्याचे मनोगत सुहास निकम यांनी व्यक्त केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव म्हणाले की,टी. व्ही.,मोबाईल व कुसंगतीचा विद्यार्थ्यांच्यावर थेट परिणाम होतो.सैनिक पॅटर्न निवासी शाळेमध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमतवाचा सर्वांगिण विकास घडविला जातोय.यावेळी त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रम व नियोजनाविषयी पालकांना मार्गदर्शन केले.

आदर्श विद्यार्थी-दिग्विजय शेंडगे,आदर्श खेळाडू-महेश मगदूम यांचा गौरव करण्यात आला.सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी  च्या परीक्षेत प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी  प्रथमेश माळी,ऋतुराज पाटील,प्रणव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते क्षितिज दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
     यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव,संस्थेच्या         कार्यवाह सौ.वनिता जाधव,मार्गदर्शक बाळासाहेब जाधव,मुख्याध्यापिका दिपाली जाधव,ब्रह्मनंद पाटील,जनार्दन पाटील,विजय जाधव,संभाजी पाटील,रमेश पाटील,एम.टी. देसाई,चंद्रकांत चव्हाण, बाळासाहेब कटारे,काशिनाथ कुंभार,नितीन गुरव,विश्वराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्या सौ.स्वाती पाटील यांनी,स्वागत शिवराज जाधव यांनी सूत्रसंचालन आश्विनी नलवडे व अर्चना शिंदे यांनी केले तर आभार प्रकाश जाधव यांनी मानले.


To Top