Sanvad News नागठाणे येथील आदर्श शाळेत बालचमूनी भरविला भोगीबाजार..

नागठाणे येथील आदर्श शाळेत बालचमूनी भरविला भोगीबाजार..


सन्मान शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे या विद्यालयात शिकणाऱ्या चिमुकल्यांनी भोगीचा बाजार भरवित व्यावहारिक ज्ञानाचे धडे गिरविले...नागठाणेतील सामाजिक कार्यकर्त्या सौ.मिनाक्षी सुनिल जाधव यांनी या बाजाराचे उद्घाटन केले.संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय यादव अध्यक्षस्थानी होते.माजी उपसरपंच सौ. जयश्री जाधव , सौ. अर्चना जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.. सर्व प्रकारच्या पालेभाज्या , फळभाज्या, फळे,चहापासून ते हॉटेलचे सर्व पदार्थ, सर्व प्रकारचे फास्ट फूडस,ड्रायफ्रूट्स , इंटिमेशन ज्वेलरी इत्यादी सर्व वस्तू विदयार्थ्यांनी बाजारात विकण्यास आणल्या होत्या. आपापल्या मालाची विक्री करण्यासाठी विद्यार्थी व्यापाऱ्यांची चढाओढ दिसून येत होती.भोगीच्या पर्शवभूमीवर मोक्याच्या वेळी बाजार सापडल्यामुळे पालक व नागठाणे  मधील नागरिक बंधू-भगिनींनी  खरेदीसाठी गर्दी केली.गावातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.सुनिल मोरे,केशव गायकवाड,रागिणी धनवडे,अनुराधा बनसोडे,स्मिता गुरव यांनी संयोजन केले.


To Top