सन्मान शिक्षण संस्थेच्या आदर्श बालकमंदिर प्राथ.शाळा माळवाडी व सन्मान पब्लिक स्कूल माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या भोगी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजाराचे उदघाटन एकात्मता बालविकास अंगणवाडी माळवाडीच्या प्रमुख सुनिता सरडे यांच्या हस्ते करण्यात आले . विद्यार्थ्यांचा बाजार विकत घेण्यासाठी मोठ्या संख्येने माळवाडी गावातील ग्रामस्थ आले होते. विद्यार्थ्यांना व्यावहारीक ज्ञान मिळावे, नफा तोटा या गणितीय संकल्पना स्पष्ट होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.या वेळी सन्मान पब्लिक स्कूल माळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता औताडे आदर्श बालकमंदिर प्राथ. शाळा माळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ. लता पाटील . श्री बाबुराव चिंचनकर , सौ. शितल माळी , विकास जंगले, अर्जुन गेंड ,रमेश बारीस, किरण गायकवाड ,संतोष कांबळे, वैभव यादव , सौ सविता महिंद , माधवी कदम तसेच मोठया संख्येने पालकवर्ग या उपक्रमासाठी उपस्थित होते.