मुलींना संस्कार घरातूनच घडले पाहिजेत .मुलींना सक्षम बनविण्यासाठीची सर्वात जास्त जबाबदारी आईची आहे .असे प्रतिपादन डॉ सौ आशा गाजी मॅडम माहेर हॉस्पिटल सांगली यांनी पलूस येथे केले .
पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्था पलूस येथे महिला पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी पलूसच्या नगरसेविका नूतन शिक्षण सभापती सौ.प्रतिभा डाके होत्या .यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.वर्षाभाभी शहा ,मुख्याध्यापक टी.जे.करांडे (सर)सौ. सविता परांजपे,सौ.पोळ मँडम, सर्व पदाधिकारी, शिक्षिका व महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ सौ आशा गाजी पुढे म्हणाल्या . चांगले आरोग्य असेल तर शरीर निरोगी व सुदृढ राहते एक चांगली मैत्री प्रगतीचे कारण ठरू शकते.मुलींना संस्कार घरातूनच घडले पाहिजेत .मुलींना सक्षम बनविण्यासाठीची जबाबदारी आईची आहे . जिद्द व चिकाटी असेल तर आपण आपल्या जीवनात निश्चीतच यशस्वी होतो , आजच्या विज्ञान युगात टिकण्यासाठी कष्टाची कास धरुण चालले पाहीजे.लोकांचं काय घेऊन बसलात. काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचा आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं.कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना सौ. प्रतिभा डाके म्हणाल्या महिलांनी स्वावलंबी कणखर असले पाहिजे .स्वतःचे गुणदोष स्वीकारुन पुढे गेले पाहिजे .पालकांनी आपल्या महत्तवकांक्षेचे बळी मुलांना बनवू नये.त्यांचा निरागसपणा चांगुलपणा जपला पाहिजे .महिलांनी स्वतःच्या तब्यतेची काळजी घेतली पाहिजे शारीरिक भावनिक बौद्धिक काळजी घेऊन व्यक्तीमत्व विकास साधला पाहिजे .
प्रमुख मान्यवरांचा परिचय सौ. तृप्ती पाटील प्रास्ताविक सौ. अलका बागल,सुञसंचालन स्मिता साळुंखे, आभार सौ.सायली मेरु यांनी मानले.