Sanvad News मानवी हव्यासापोटी पर्यावरण धोक्यात; रामानंदनगर कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्रात तज्ञांनी व्यक्त केली चिंता.

मानवी हव्यासापोटी पर्यावरण धोक्यात; रामानंदनगर कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्रात तज्ञांनी व्यक्त केली चिंता.

पलुस तालुक्यातील रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट्स सायन्स अँण्ड कॉमर्स कॉलेज, रामानंदनगर येथे राष्ट्रीय एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशात्र विभागाद्वारे आयोजित या चर्चासत्राचा विषय होता, 'संवर्धन आणि जैवविविधता जतन'.
या चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठचे डॉ. एस. आर. यादव, घुबडांवर काम करणार्या पुणे येथील इला फौंडेशनचे प्रा.डॉ. सतीश पांडे, जैवविविधता संवर्धन फौंडेशनचे डॉ. वरद गिरी आदी विषयतज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
या चर्चासत्राचे संयोजन चर्चासत्र समन्वयक प्रा.अभिजीत माने, प्रा. अरविंद औंधकर, डॉ. बी.ए. सोनार, डॉ. टी.एस. भोसले यांनी केले.
या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम म्हणाले,
काळ झपाट्याने बदलत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर रोज नवी आव्हाने आपल्या समोर उभी ठाकत आहेत. यावर उपाययोजना म्हणून पर्यावरण र्हास रोखण्यासाठी इको व्हिलेजची संकल्पना उपयुक्त आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. व्ही. वाय. देशपांडे म्हणाले, 
पर्यावरण  धोक्यात आहे याची चर्चा सर्वत्र होते. संवर्धन आणि जतन हा  शब्द गांभिर्याने चर्चेत आल्याचा विषेश आनंद होत आहे. 
यावेळी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य ए डी जाधव म्हणाले, लोक विकासासाठी धडपडतात पण त्यावेळी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विचार करत नाहीत. मग हा विकास विनाशाकडे नेऊ शकतो.

यावेळी आपल्या बिजभाषणात    भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे विषयतज्ञ डॉ.एस आर. यादव म्हणाले,
पर्यावरण र्हासाला मानवी हव्यासच कारणीभूत आहे. रसायनिक खतांमुळे शेतीचे आरोग्य धोक्यात आले आहे. निसर्गामध्ये प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. आपण हक्काच हिरावून घेतला आहे. पश्चिम घाटातील ७० टक्के जैव विविधता धोक्यात आली आहे. आयुष्यातील प्रत्येक आनंद जैवविविधततेतून येतो. झाडांशिवाय आपण वाचू शकणार नाही.
पर्यटनामुळे कास पठाराचा विध्वंस होत आहे. कुणाचं स्वागत करण्यासाठी फुलांना पर्याय नाही.
प्रत्येक फुलांचा रंग रूप आकार वेगळा असतो. ३०% तरूण मुली कुपोषित आहेत. त्यांना लोह आणि प्रथिनांची कमतरता आहे.  ती पुर्ण करणाऱ्या अनेक वनस्पती पश्चिम घाटात उपलब्ध आहेत. प्रत्येक श्वासाला आपण एक रूपयाचा ऑक्सिजन घेतो. दिवसाला २१ हजाराचा घेतो. ज्याची किंमत झाडांना चुकवायला हवी.
वसुंधरेच अस्तित्वच धोक्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी सर्वांनीच पुढे येण्याची गरज आहे. 
या चर्चासत्रात घुबडांवर काम करणार्या इला फौंडेशनचे डॉ. सतीश पांडे म्हणाले, 
दरवर्षी हजारो घुबडं काळ्या जादूसाठी मारली जातात. समोर डोळे असणारा एकमेव पक्षी आहे. त्यामुळे त्यांना मागून हल्ल्याचा धोका असतो.
 त्यांच्या विषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत.  घुबडांना एतिहासिक पारंपरिक आणि धार्मिक महत्त्व आहे. घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. घुबडाच्या विविध जाती आणि त्यांचे वेगळेपण आपणास पश्चिम घाटात पहायला मिळतात. ज्या परिसरात घुबड सापडते त्याच परिसरात पुन्हा सोडायला हवे. घुबडाची मान ३६०° पर्यंत फिरू शकते. अतिशय मऊ पंखांमुळे आवाज न करता भक्षावर हल्ला करण्याची क्षमता घुबडात असते. शिकारी पक्षी पकडताना त्याचे पाय पकडा, चोच पंख पकडू नका. स्मशानात उंच झाडांमुळे घुबड जाऊन बसतात. पण गैरसमजातून बळी ठरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तर पालीवर संशोधन करणारे डॉ.वरद गिरी म्हणाले,
ज्यांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नाही. अशा व्यक्तीची माहितीनेच आपलं डोकं अधिक भरलेलं आहे. अन्नसाखळीत प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. माणूस स्वतःच पर्यावरण स्वतः नष्ट करायला लागला आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. फक्त वाघ वाचवला की झालं असं नाही. निसर्गातील बेडकापासून पालीपर्यंत प्रत्येक प्राण्याचा जीव तितक्याच महत्त्वाचा आहे. एखाद्या जीव नष्ट झाला तर पर्यावरण संतुलनावर त्याचा परिणाम होत असतो. हा धोका ओळखून सर्वच उभयचरांचे संवर्धन आणि जतन गरजेचे आहे.
 यावेळी मांन्यवरांच्या हस्ते शोधपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये ३९शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले आहेत. तसेच  ११ शोधपत्रक प्रदर्शित करण्यात आले.
या चर्चासत्राचे सुत्रसंचालन प्रा.उज्वला पाटील, नंम्रता चौगुले, 
 तेजश्री चौगुले यांनी केले.

To Top