सन्मान शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे ता. पलूस येथे विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.नागठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.त्रिवेणी मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व सन्मान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाले.
सकाळी पारंपारिक वेशभूषेत विदयार्थ्यांनी गावातून रॅली काढली.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. लाठीकाठी,झांज,लेझीम,आदीसह मराठमोळ्या मैदानी खेळ प्रकाराचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.त्यास उपस्थितांनी प्रतिसाद दिला.
सरपंच त्रिवेणी मोकाशी,प्रा. संजय यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुनिल मोरे यांनी केले, सूत्रसंचालन सौ.रागिणी धनवडे यांनी तर आभार केशव गायकवाड यांनी मानले.
यावेळी गणेश यादव,प्रमोद जाधव,बालवाडी विभागप्रमुख सौ.अनुराधा बनसोडे,सौ.स्मिता गुरव आदींसह पालक उपस्थित होते.