Sanvad News आजच्या तरूणाईत नियोजनाचा अभाव - नितीन बानुगडे पाटील; रामानंदनगर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभ आनंदात साजरा.

आजच्या तरूणाईत नियोजनाचा अभाव - नितीन बानुगडे पाटील; रामानंदनगर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभ आनंदात साजरा.


    आजच्या तरुणाईत नियोजनाचा आभाव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काही ठोस काम होताना दिसत नाही. आजच्या तरुणाईने छत्रपती शिवाजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नियोजनाला महत्त्व दिले पाहिजे. तरच त्यांच्याकडून काहीतरी रचनात्कम कार्य होईल. तरुणाईने संकटांना न घाबरता सामोरे गेले पाहिजे. कारण संकटेच तुम्हाला स्वत:तील क्षमतांची ओळख करून देत असतात. असे मत नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले. ते रामानंदनगर येथील आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
           यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जे. के. (बापू) जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आजच्या तरुणामध्ये कष्ट करण्याची तयारी नाही. कोणतीही गोष्ट सहज मिळविण्याकडे तरुणाईचा कल आहे. आपल्या कार्यात सातत्य आणि चिकाटी ठेवून संघर्ष करत मिळवलेले यश चिरकाळ टिकणारे असते.         यावेळी सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय विभुते, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ माने, पलूस-कडेगाव युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, पुणदीचे सरपंच संपत पाटील (पापा) उपस्थित होते. 
            महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार उपप्राचार्य डॉ. काकासाहेब भोसले यांनी मानले. वार्षिक अहवालाचे वाचन कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष डॉ. व्ही. बी. पाटील यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावाचे वाचन प्रा. संदेश दौंडे व प्रा. दिलीप कोने यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. उज्ज्वला पाटील व प्रा. सुमय्या नदाफ  यांनी केले.
To Top