Sanvad News श्रीमंत लालासाहेब इनामदार विदयालय पलूस येथे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम.

श्रीमंत लालासाहेब इनामदार विदयालय पलूस येथे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम.


सन्मान शिक्षण संस्थेच्या श्रीमंत लालासाहेब इनामदार विदयालय पलूस येथे वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन  कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
इस्लामपूरचे नामवंत उदयोजक श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत व संदिप (नाना )सिसाळ(बांधकाम सभापती पलूस नगर परिषद पलूस) यांच्या अध्यक्षतेखाली व  सोमनाथ( दादा ) होमकर(अध्यक्ष पलूस व्यापार संघटना) व सन्मान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय यादव यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले.

 मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यकमाची सुरवात केली.
 विविध स्पर्धेतील यशस्वी  विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन  गौरवण्यात आले.
        पाहुणे श्रीकांत पाटील म्हणाले की,श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालय ही उपक्रमशील आहे. अनेक विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेबरोबर उच्च शिक्षण घेत आहेत. पलूस शहरातील नामवंत शाळेतही सर्वांत दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे.
    बांधकाम सभापती संदिप सिसाळ म्हणाले की, पालकांनी विदयार्थ्यांवर पूर्णवेळ लक्ष देऊन शिक्षण क्षेत्रात नाव कमावेल असे शिक्षण देण्याचे प्रयत्न करावेत. पालकांनी स्मार्ट मोबाईल, टी.व्ही. मालिका यापासून मुलांना दूर ठेवावे व संस्कारक्षम मालिका दाखवाव्यात असेही आवाहन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कटारे सरांचे अचूक नियोजन व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांची नेहमी विदयार्थांच्या हिताची व शाळेच्या प्रगतीसाठी धडपड असल्याकारणाने शाळा नावारूपास आली आहे.

  यावेळी पलूस शाखेचे अध्यक्ष व पंचायत समिती पलूसचे माजी सभापती सभापती अमरसिंह इनामदार (भाऊ ),संदीप क्षीरसागर, विशाल लाड ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  विजयकुमार फल्ले गुरुजी, बालवाडी विभागाच्या प्रमूख  रंजना पाटील मॅडम, सारिका पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कटारे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर तावरे सरांनी केले तर आभार  प्रशांत राठोड सरांनी केले.


To Top