प्राथमिक मुलामुलींचे विदयामंदिर कवठेमंहकाळ येथे वार्षिक पारितोषिक वितरण व जागतिक महिला दिनानिमित्त विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब कटारे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जगन्नाथ माळी साहेब बांधकाम सभापती कवठेमंहकाळ नगरपंचायत कवठेमंहकाळ, प्रमुख उपस्थिती नगरपंचायतचे नगराध्यक्ष मा.पंडितराव दळवी, उपनगराध्यक्षा मा. सिंधुताई गावडे,संस्था उपाध्यक्ष मा. ईश्वर आप्पा पवार, शिक्षक परिषदेचे मार्गदर्शक मा. चंद्रकांत चव्हाण, शिक्षण सेवक सोसायटीचे संचालक मा. शरद पाटील, मुख्याध्यापक मा. भाऊसाहेब भोसले, सर होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रथम सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली.
प्रमुख पाहुणे मा.बाळासाहेब कटारे म्हणाले की, अनेक स्तुत्य उपक्रमाने शाळा नेहमीच पालकांच्या चर्चेत असते. या शाळेचे अनेक विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेबरोबर उच्च शिक्षण घेत आहेत. कवठेमंहकाळ शहरातील नामवंत शाळेतही सर्वांत दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे.विदयार्थ्यांवर पूर्णवेळ लक्ष देऊन शिक्षण क्षेत्रात नाव कमावेल असे शिक्षण देण्याचे प्रयत्न करावेत. पालकांनी स्मार्ट मोबाईल,टी.व्ही. मालिका यापासून मुलांना दूर ठेवावे व संस्कारक्षम मालिका दाखवाव्यात असेही आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जगन्नाथ माळी साहेब म्हणाले की हि शाळा अनेक उपक्रमामुळे कवठेमंहकाळ पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. याचे सर्व श्रेय येथिल मनापासून कष्ट घेणारे सर्व शिक्षक यांचे आहे. पुढे कोणतीही मदत लागली तर आम्ही देऊ असे हा त्यांनी शब्द दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब भोसले सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. भाऊसाहेब भोसले सरांनी केले तर आभार मा.नंदा शिंदे यांनी मानले.
यावेळी नगरपंचायत कवठेमंहकाळचे नगराध्यक्ष मा.पंडितराव दळवी, संस्था अध्यक्ष व राज्यांचे मंत्री मा. अजितराव घोरपडे सरकार, सांगली जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती मा. आशाताई पाटील, कवठेमंहकाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा मा. सिंधुताई गावडे, शिक्षक परिषदेचे मार्गदर्शक मा.चंद्रकांत चव्हाण दादा, संस्थेचे उपाध्यक्ष मा. ईश्वर आप्पा पवार , संस्थेचे मानद सचिव मा. राजवर्धन घोरपडे सरकार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. शरद पाटील, शाळेतील सर्व सहा. शिक्षक व शिक्षिका, बालवाडी विभागाच्या सर्व शिक्षिका आणी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होता.