Sanvad News पुणे टाईल्स अँड सॅनिटरीवेअर डिलर्स असोसिएशन मार्फत आमणापूरात ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

पुणे टाईल्स अँड सॅनिटरीवेअर डिलर्स असोसिएशन मार्फत आमणापूरात ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.



ऑगस्ट २०१९ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापू रा मुळे आमणापूर परिसरातील विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. पुणे टाईल्स व सॅनिटरीवेअर डिलर असोसिएशनने याची दखल घेत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे नियोजन केले होते. त्या नुसार असोसिएशनचे पदाधिकारी जगदीश पटेल जिग्नेश पटेल अश्विन गांधी कमलेश ठक्कर घनश्याम गोहिल संजय गांधी यांनी प्रत्यक्ष आमणापूर येथे येवून परिसरातील शाळांना सुमारे ३५० शालेय साहित्य किटचे वाटप केले. जिल्हा परिषद शाळा आमणापूर, बोरजाईनगर, विठ्ठलनगर, अनुगडेवाडी, शेरीमळा अशा पाच शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य वितरित केले. शालेय साहित्य प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी मुख्याध्यापिका सुनिता मोकाशी सहशिक्षक संदीप कांबळे यांनी प्रयत्न केले. केंद्रशाळेतील मनिषा रावळ कविता कांबळे ज्योती पाटील सारिका गंभीर सुनिता करपे आसिफा नदाफ शंकर टकले  राजेंद्र मोटकट्टे सिंधूताई चोपडे जयश्री भोसले उपस्थित होते. स्वागत धोंडीराम पिसे यांनी केले तर आभार सुरेश खारकांडे यांनी मानले.


To Top