विविध नवनवीन उपक्रम राबवणारी भारतमाता ज्ञानपीठची सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशाला सर्वत्र परिचित आहे.प्रशालेने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबवून व्यवहारी बनवले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे,त्यांचे आरोग्य सुधारणे यासाठी प्रशालेने नेहमीच लक्ष दिले आहे.प्रशालेत पूरक आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंडी,फळे,दुध, बिस्किटे चिंक्की राजगिरालाडू
यांचे सातत्याने वाटप केले जाते.
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे.उन्हाची दाहकता वाढत आहे.या दाहकतेपासून आराम मिळावा म्हणून प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना ऊसाचा रस देण्यात आला. यासाठी प्रशालेत ऊसाच्या रसाचा गाडा आणला होता. ऊसापासून रस बनवून विद्यार्थ्यांनी ताज्या रसाचा आस्वाद घेतला.थंडगार ऊसाचा रस पिऊन विद्यार्थी तृप्त झाले.याशिवाय ऊसापासून रस कसा बनवला जातो याचेही ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले.
सदर उपक्रम राबविण्यासाठी प्रशालेचे संस्थापक रघुराज मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर, कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.तर प्रशालेतील शिक्षक शंकर कांबळे, राजू गारोळे,तात्यासो शेंडगे, अभिजीत निरगुडे,तोसीम शिकलगार,सागर वाघमारे, सुभाष होनवार,राहुल बल्लाळ ,संदीप पाटोळे यांचे सहकार्य लाभले.
एक अनोखा उपक्रम राबविल्यामुळे प्रशालेचे परिसरातून व पालकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.