Sanvad News कब बुलबुल जिल्हास्तरीय मेळाव्यात जिल्हा परिषद शाळा निंबळकचे घवघवीत यश

कब बुलबुल जिल्हास्तरीय मेळाव्यात जिल्हा परिषद शाळा निंबळकचे घवघवीत यश


 विजयनगर (म्हैसाळ) ता. मिरज या ठिकाणी जिल्हा मेळावा पार पडला. यामध्ये जिल्हा परिषद शाळा निंबळक या शाळेतील छत्रपती संभाजी महाराज पथकाने सहभाग नोंदवून जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कब पथक म्हणून बहुमान मिळवला .तसेच शोभायात्रा स्पर्धेत प्रथम क्रमांक, संचलन स्पर्धेत द्वितीय ,तर शेकोटी (सांस्कृतिक कार्यक्रम) स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. या पथकामध्ये प्रज्वल रवींद्र माने, उज्वल सतीश गुरव, सार्थक नितीन काळबागे , ओम भास्कर खाडे, प्रतीक रवींद्र निकम, विराज नवीन पाटील, रुद्र श्रीकांत पाटील व अथर्व भगवान साळुंखे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. हे यश मिळविण्यामध्ये कब मास्टर श्री .रवींद्र सुबराव माने व सौ. माया रवींद्र माने यांचे बहुमोल योगदान मिळाले. तसेच श्री. खाडे सर ,श्री .शेंडगे सर, श्री .जाधव सर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष सावंत, उपाध्यक्ष श्री.राजाराम साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .विजेत्या स्पर्धकांना जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे ,माजीमंत्री डॉ. सुरेश खाडे, समाजकल्याण सभापती श्री. प्रमोदआप्पा शेंडगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. सुनंदा वाखारे मॅडम आदी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
To Top