Sanvad News विनाअनुदान शिक्षकांना आमदार दत्तात्रय सावंत यांचा मदतीचा हात.

विनाअनुदान शिक्षकांना आमदार दत्तात्रय सावंत यांचा मदतीचा हात.

      पलूस तालुक्यातील विनाअनुदान शाळेतील विनावेतन काम करणार्या शिक्षकांना पुणे विभाग शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत यांनी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून लाॅकडाऊन च्या काळात त्यांच्या संसाररूपी गाड्यास हातभार लावला आहे.

          लाॅकडाऊन काळात विनाअनुदान शाळेतील विनावेतन काम करणार्या शिक्षकांचे हाल होत असताना सामाजिक भावनेतून पुणे विभाग शिक्षक आ. श्री दत्तात्रय सावंत यांनी सांगली जिल्ह्यातील निवडक शिक्षकांशी व्हिडीओ काॅन्फरन्स द्वारे चर्चा करून सुचना दिल्यानुसार पलुस तालुक्यातील कार्यकारीणीच्या माध्यमातून या शिक्षकांना गृहउपयोगी व जीवनावश्यक मालाचे वाटप करण्यात आले . हे वाटप शासकीय नियंमांचे पालन करून , सामाजिक अंतर राखून करण्यात आले. 
             यावेळी तालुक्यातील सेकंडरी स्कूल भिलवडीचे श्री तानाजी पाटील सर, ब्रम्हनाळ हायस्कूलचे श्री सचिन मोरे सर , ताकारी हायस्कूलचे श्री अजित पाटील सर , रामानंदनगर विद्यालयाचे श्री रामचंद्र दिक्षीत सर व ल. कि. पलुस चे श्री बडगुजर सर यांनी काम पाहिले. कृतिसमिती पलुस तालुका संपर्क प्रमुख श्री नितीन जाधव सर यांनी मार्गदर्शन केले.

To Top