आपल्याला नेहमी सोबत करणारी सावली अचानक आपली साथ सोडून देते याचा अनुभव आज भारती शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका विद्यार्थी विद्याथिर्नी आणि प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थी व विद्याथिर्नीने घेतला.
कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात टेरेसवर शुन्य सावलीचा प्रयोग प्रत्यक्षात अनुभव घेतला.या सर्व आठवणी प्रत्येकाने फोटो काढुन विद्यालयाच्या शैक्षणिक ग्रुपवर पाठविण्याचे आवाहन संस्थेचे सचिव मिलिंद जाधव साहेब यांनी केले. मुख्याध्यापक श्री.अरविंद कांबळे सरांनी पाईपचा प्रयोग करुन या शुन्य सावलीचा व्हिडिओ तयार केला.
दुपारी 12 वाजुन 28 मिनिटांपासुन जवळजवळ 52 सेंकदापर्यत सावलीने साथ सोडली होती.खगोलशास्त्रात याला झिरो शॅडो डे म्हणजेच शून्य सावली दिवस म्हणतात.
विज्ञानशिक्षिका साै.विजया जाधव यांनी पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस संतांनी केलेला आहे.त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन सुरू होते या प्रवासात सूर्योदय व सूर्यास्ताची जागा बदलत असते.23 डिसेंबर ते 21 जून सूर्याचे उत्तरायण असते तर त्यानंतर दक्षिणायन या दरम्यान असे दोन दिवस येतात की मध्यान्हीच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो त्यावेळी प्रत्येक सरळ वस्तूंची सावली पायाखाली असते आणि काही वेळ गायब असते याच दिवसाला शुन्य सावली दिवस म्हणतात ही माहिती दिली.दोन्ही विद्यालयाच्या अनेक मुलांनी व शिक्षकांनी यांच्यामध्ये सहभाग घेतला सर्व टीमचे अध्यक्ष श्री गणपतराव सुर्वे सरांनी अभिनंदन केले.