कर्तव्य बजावत असताना डफळापूर ता. जत येथे ट्रक चालकाने चिरडलेले शिक्षक नानासाहेब कोरे यांच्या परिवारास प्रशासनाने तात्काळ मदत द्यावी,तसेच कोरोना युद्धात सहभागी झालेल्या शिक्षकांना कोणतीही जोखमीची कामे देवू नयेत आशा मागणीचे निवेदन सांगलीचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व पदाधिकारी वर्गास महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात आले.
माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे,माध्यमिक विभागाचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे,प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे,जिल्हा उपाध्यक्ष नितेंद्र जाधव,विजय माने,अशोक घोरपडे आदी पदाधिका-यांना निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता कोरे यांना दिले.नानासाहेब कोरे या शिक्षकांस ज्या अधिकाऱ्याने नाकाबंदीची जबाबदारी दिली त्यांची चौकशी करावी.त्यांच्या परिवारास पन्नास लाख रुपये मदत करावी,कुटुंबास निवृत्तीवेतन व अनुकंपा योजनेचा लाभ द्यावा.समाज घडविणाऱ्या शिक्षकांना कोरोना युद्धात सहभागी करून घेताना नाकाबंदी,मद्यविक्रीची ठिकाणे,विलगीकरण केंद्र आदी ठिकाणी नियुक्ती देऊ नये अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.