योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर, मन आणि आत्मा हे शरीराचे तीन मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. यातून चांगुलपणाची भावना निर्माण होते. योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते. सिंधू संस्कृतीत सुद्धा योगमुद्रा आणि समाधी स्थितीतील मूर्त्या आढळतात. हिंदू धर्मात साधू, संन्यासी आणि योगी सुरुवातीपासूनच योगमार्गाचे आचरण करत मात्र सामान्य लोकांचा याच्याशी फारसा संबंध नव्हता. अलीकडेच सामान्यांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढते आहे. कारण आजकालची तणावपूर्ण जीवनशैली ही सर्वसामान्यांची दिनचर्या बिघडवून टाकत आहे.
स्कूल च्या विद्यार्थियांच्या शैक्षणिक विकसाबरोबर क्रीड़ा , सांस्कृतिक व आरोग्य च्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करून घेतला जातो..
..स्कूल के प्रिंसिपल डॉ. एम.एस.प्रभाकरन सर ,
मैनेजर सुमसीन कणाई सर व सर्व शिक्षक व कर्मचारि यांनी योगा प्रात्यक्षिके केली....