Sanvad News पंडीत विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालय पलूस येथे ऑनलाईन योगदिन साजरा.

पंडीत विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालय पलूस येथे ऑनलाईन योगदिन साजरा.


पंडीत विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालय पलूस येथे. २१जून २०२०ऑनलाइन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणेत केला..योग विद्या धाम, पलूस
संलग्न योग विद्या गुरुकुल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २१जून रोजी सकाळी ७ते ८ या वेळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणेत आला..
   ऑनलाईन योग प्रशिक्षण योगशिक्षक सुहास निकम व सहशिक्षक विकास गुरव  यांनी दिले.गुरुवंदना, ओमकाराने सुरुवात केली गेली. दंड स्थिती, विपरीत शयन स्थिती, शयन स्थिती व बैठक स्थितीतील काही आसन करणेत आली. प्राणायामाचे काही प्रकार व ध्यान करणेत आले.प्रार्थना व ओमकाराने सांगता करणेत आली.या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या ऑनलाईन शिबिरात योग पंडित अधिकराव मोरे, अभिजित पाटील व योगा करणारे सर्व जण सहभागी झाले होते.वर्षी लाँकडाऊनमुळे मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार घरीच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
लॉक डाऊन संपले नंतर पुढील योगा प्रशिक्षण शिबिर सुरू करणेचे ठरले आहे.संयोजन योग विद्या धाम पलूस यांनी केले.

To Top