Sanvad News खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींना निवेदन;शिक्षकांच्या विविध प्रश्नावर झाली सकारात्मक चर्चा.

खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींना निवेदन;शिक्षकांच्या विविध प्रश्नावर झाली सकारात्मक चर्चा.

 

 म रा  खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण आरोग्य समितीच्या सभापती सौ.आशाताई पाटील,प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ.सुनंदा वाखारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली.शिक्षकांची सर्व प्रलंबित प्रश्न समन्वयाने सोडविण्याची सकारात्मक चर्चा करण्यात आली. शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षण सभापती सौ.आशाताई पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


यावेळी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे,परिषदेचे सांगलीचे कार्याध्यक्ष  राजाराम व्हनखंडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे,उपाध्यक्ष नितेंद्र जाधव,मार्गदर्शक चंद्रकांत चव्हाण,विजय काटकर,शरद जाधव,सिद्राम देवकुळे,श्रीकांत वाघमारे,सुनिल वंजाळे आदी उपस्थित होते.
सन २०१९साली अनुदानावर आलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके व शालेय पोषण आहार योजनेचा लाभ द्यावा. आर. टी. ई. मान्यतेबाबतचे प्रस्ताव तालुकास्तरावर भविष्यात   कॅपला तपासले जावेत. सादिल व वेतनेत्तर अनुदानाची रक्कम शाळांना मिळावी.पात्र असणाऱ्या शाळात मुख्याध्यापक पदांना मंजुरी द्यावी.कोरोणाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजी बाबत खाजगी प्राथमिक शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे. वरिष्ठ वेतनश्रणी प्रस्ताव मंजूर करावेत,संच मान्यता प्रस्ताव दुरुस्ती करून मिळावी. सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांच्या जागेवर नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याध्यापकांना तात्काळ मान्यता मिळावी.आदी विविध विषयांवर शिक्षण सभापती कक्षात सविस्तर चर्चा झाली.

सांगली जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद ही शाळा व शिक्षकांच्या हिताला प्राधान्य देणारी सेवाभावी कार्यकर्त्यांची संघटना आहे.संघटनेचे पदाधिकारी,जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली.अशा पद्धतीने विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाईल. असे प्रतिपादन भगवानराव साळुंखे यांनी केले.


शिक्षण सभापती सौ.आशाताई पाटील यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून विविध विषयांवर चर्चा घडवून आणली व मार्गदर्शन केले.शासनाचे नियम व आदेशास आधीन राहून सांगली जिल्ह्यातील खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. लॉकडाऊन उठल्यानंतर खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सौ.सुनंदा वाखारे यांनी दिली.

To Top