ब्रह्मानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर(बुरुंगवाडी) मधील शिक्षक विजय जाधव यांचा संस्थेच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
विजय जाधव हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी विद्यालयात सदतीस वर्षे सेवा केली.विद्यार्थीप्रिय शिक्षकांबरोबर शिक्षका बरोबरच ग्रामीण कथाकार, वक्ते,कादंबरीकार, नाट्यकलावंत, दिगर्दशक, उत्कृष्ट खेळाडू म्हणून ते परिचित आहेत शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष सुनिल जाधव व वसंतराव माळी यांच्या हस्ते विजय जाधव व सौ.सौ.विद्याताई जाधव असा सपत्निक सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्ती नंतर मी सदैव संस्था,विद्यालय,शिक्षक सहकारी यांच्या ऋणात राहीन असे मनोगत सत्कारमूर्ती विजय जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी वसंतराव माळी,प्रकाश पाटील, संदिप कदम,सौ.दिपाली जाधव यांनी मनोगतातून विजय जाधव सरांच्या विषयी विविध आठवणींना उजाळा दिला.
ब्रह्मानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनिल(बापू) जाधव,द्रक्षगुरू वसंतराव माळी, मुख्याध्यापक बी.पी.जाधव, विश्वस्त राजाराम जाधव,देवानंद पाणबुडे,बजरंग जाधव,श्रीमती शकुंतला जाधव,,सौ.एस. ए.पाटील,यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ,विजय जाधव यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत अमोल जाधव यांनी, सूत्रसंचालन रवी राजमाने यांनी तर आभार अनिल गुरव यांनी मानले.