भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांचा 25वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.के.डी.पाटील यांनी स्व.चंद्राताई शेणोलीकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती सांगून विनम्र अभिवादन केले.
शिवरामबापू यादव,विश्वस्त जे. बी.चौगुले,संचालक गिरीश चितळे, डी.के.किणीकर, दादासो चौगुले,डॉ.सुनिल वाळवेकर, प्रा.आर.डी.पाटील,जयंत केळकर,सौ. लीना चितळे, प्राचार्य श्रीकांत चव्हाण, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.शुभांगी मन्वाचार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या टोणपे,सौ.स्मिता माने, सुचेता कुलकर्णी,आजीव सदस्य प्रा.सौ.मनिषा पाटील,प्रा.एम.आर.पाटील,विजय तेली,संभाजी माने,रमेश पाटील,हणमंत डिसले आदींसह सर्व शाखांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सोशल डिस्टंसिंग च्या नियमावलीचे पालन करीत सर्वांनी स्व.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले.