Sanvad News आळते शाळेतील शिक्षक अशोक माने सेवानिवृत्त;ग्रामपंचायतीने केला सत्कार

आळते शाळेतील शिक्षक अशोक माने सेवानिवृत्त;ग्रामपंचायतीने केला सत्कार

       

जिल्हा परिषद शाळा आळतेचे उपशिक्षक श्री अशोक आनंदा माने हे दि.३१/८/२०२० रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ जिल्हा परिषद शाळा आळते येथील बहुउद्देशीय सभागृहात आज पार पडला. यावेळी आळते ग्रामपंचायतीच्या वतीने श्री महादेव बापू सूर्यवंशी यांनी, बोरगाव केंद्राच्यावतीने प्रभाकर तीरमारे यांनी तसेच श्री मोहिते सर मुख्याध्यापक विद्या निकेतन तासगाव, श्री सुशांत चव्हाण सर मुख्याध्यापक पानमळेवाडी व श्री आनंदा गेजगे सर यांनीही त्यांचा सत्कार केला. 


यावेळी माने सरांच्या विद्यार्थिनी कु.स्नेहा रामचंद्र पाटील व कु.आरोही दीपक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळावी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय बापूसाहेब पांडुरंग हजारे हे होते. याप्रसंगी बोलताना हजारे साहेब यांनी अशोक माने सर यांना शुभेच्छा दिल्या व म्हणाले की आळते गावचे नेते मनोज नाना पाटील यांच्या सहकार्याने शाळेची इमारत भव्य दिव्य झाली आहे. त्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी शाळेला निधी कसा मिळेल यासाठी ग्रामपंचायत मालकीच्या मंगलकार्यालयचे येणारे भाडे शाळेला देतात तसेच शाळेत चिंचेची सुमारे 300 झाडाची लागवड करून घेतली आहे त्या चिंचेचे उत्पन्न शाळेसाठी वापरले जाते. त्याच बरोबर ग्रामपंचायत कोणत्याही नोंदणीसाठी शाळेची कुवतीनुसार देणगी पावती घेतली जाते, तलाठी कार्यालयात नोंदी साठी शाळेची देणगी पावती घेतली जाते.लोक ती उत्स्फूर्तपणे देणगी देतात. असे नेते मंडळी शोधून ही सापडणार नाहीत.आज शाळा सर्व भौतिक सुविधांनी सुसज्य आहे., त्यामुळे शाळेला जिल्हा आदर्श व स्वच्छ सुंदर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांनी मनोज नानांना धन्यवाद दिले. 


मा.श्री.एम.बी.पाटील (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) मा.श्री.के.आर.पाटील (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) मा.श्री.मनोज नारायण पाटील(माजी उपसरपंच आळते) मा.श्री.महादेव बापू सुर्यवंशी (उपसरपंच आळते) मा.श्री.विठोबा भिमराव पाटील (चेअरमन आळते सोसायटी) मा.श्री.दशरथ पांडुरंग पाटील (अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती), मा.श्री.प्रभाकर तीरमारे ( केंद्रप्रमुख बोरगाव) मा.श्री.आनंदा गेजगे (उपशिक्षक तुरची) मा.श्री.सुशांत चव्हाण (उपशिक्षक पानमळेवाडी) मा.सौ.लता अरुण पाटील (मुख्याध्यापक आळते) यांच्या सह नितांत तांबडे ,लक्ष्मण नायकवडी, ऋषीकेश मुळे सुवर्णा पोवार, मिनाक्षी पाटील,आळते शाळेचा सर्व स्टाफ उपस्थित होता. माने सरांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सेवापूर्तीनिमित्त माने सरांनी आळते शाळेस पंधरा हजार रुपयांचाUV फिल्टर भेट दिला.प्रास्ताविक नितीन चव्हाण यांनी केले व नितांत तांबडे सर यांनीआभार मानले.


To Top