सांगली जिल्ह्यातील शाळांचे समग्र शिक्षा अभियानांतर्गत करण्यात येणाऱे लेखापरीक्षण स्थगित करण्याची मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण कमिटी सदस्य बाबासाहेब लाड यांनी लेखाधिकारीसो व प्राथमिक शिक्षणाधिकारीसो यांच्याकडे केली आहे
जिल्ह्यातील कोविड१९ चार प्रादुर्भावामुळे शाळा,पंचायत समित्या, जिल्हा परिषदेचे कामकाज वर्क फ्रॉम होम सुरु आहे.दरम्यान महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांचे सन २०१९-२०मधील लेखा परीक्षणाकरिता मे.संकपाळ कुलकर्णी अॅऺण्ड असोसिएट्स कोल्हापूर यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सप्टेंबर २०२० पहिल्या लेखापरीक्षण तालुकास्तरावर येणार असल्याबाबत मे.संकपाळ कुलकर्णी अॅऺण्ड असोसिएट्सने फोनवरुन जिल्हा प्राथमिक शिक्षक विभागाकडे कळविल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या शाळांना सन २०१९-२० अनुदान देण्यात आलेल्या शाळांचे लेखापरीक्षण करुन घेण्याबाबत कळविले आहे. शाळांचे लेखापरीक्षण तालुकास्तरावर घेतल्यास कोविड१९चा संसर्ग होऊ शकतो त्याबाबत आपण वरीष्ठ कार्यालयाशी संपर्क साधावा व लेखापरीक्षण केंद्रस्तरावर एक-दोन शाळा बोलावून कोविड१९ बाबत सुरक्षेची जबाबदारी घेतली जावून करावी. वय वर्षे ५० वरील शिक्षकांच्यावर शाळा प्रमुखाची जबाबदारी आहे. याबाबत योग्य दखल घेण्यात येऊन तालुक्यातील शाळांचे लेखापरीक्षण कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर करण्यात यावे अशी मागणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, शिक्षक बॅंकेचे व्हा.चेअरमन महादेव माळी,तुकाराम गायकवाड, शशिकांत भागवत, बाळासाहेब आडके, इक्बाल मुल्ला, लक्ष्मण मोहिते, विकास चौगुले, सतिश नलवडे, अमोल साळुंखे, दिपक सावंत, आप्पासाहेब जाधव उपस्थित होते.