छत्रपती शिवाजी विद्यालय, दुधोंडी या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ए.एस.कांबळे सर यांना महाराष्ट्र् राज्य शाळा कृती समितीच्या वतीने कृतीशील मुख्याध्यापक या पुरस्काराने गौरविण्यात आले.शिक्षक आमदार श्री.दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते आणि भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक,उद्योजक श्री.गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
सेंकडरी स्कुल आणि ज्युनिअर काॅलेज भिलवडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पलुस तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.मुख्याध्यापक ए.एस.कांबळे यांनी शिक्षकी पेशात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना हा बहुमान मिळाला आहे.या यशाबद्दल भारती शिक्षण प्रसारक मंडळ,दुधोंडी,छ.शिवाजी विद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदिर दुधोंडी,अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव व सर्व संचालक ,सभासद व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर
सेवकवृंद यांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.