Sanvad News डॉ.झाकिर हुसेन हायस्कूल व ज्यु.कॉलेज पलूस येथील सहाय्यक शिक्षक श्री.आरिफ लतीफ यांना कृतीशील शिक्षक पुरस्कार प्रदान

डॉ.झाकिर हुसेन हायस्कूल व ज्यु.कॉलेज पलूस येथील सहाय्यक शिक्षक श्री.आरिफ लतीफ यांना कृतीशील शिक्षक पुरस्कार प्रदान



     सेंकडरी अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्या वतीने डॉ.झाकिर हुसेन हायस्कूल पलूस येथील सहाय्यक शिक्षक श्री.अरिफ लतीफ यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे विभागाचे विद्यमान शिक्षक आमदार श्री. दत्तात्रय सावंत यांच्या शुभ हस्ते व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक उद्योजक गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. आमदार श्री.दत्तात्रय सावंत म्हणाले की, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करणे आवश्यक आहे. पुरस्कार देऊन गौरव झाल्यामुळे शिक्षकांना नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना अजून जास्त चांगल्या पद्धतीने ज्ञानदानाचे काम करून चांगले विद्यार्थी घडवतात. इथून पुढील काळात सुद्धा शिक्षकांच्या जिल्हा पातळीवरील, राज्य पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी आपण तत्पर राहू. 
        कृतीशील पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे कार्यवाह हाजी कारी बदिउज्जमा शेख, मुख्याध्यापक आलीम शेख सर, सर्व शिक्षक, मदरसा स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अरिफ सरांचे अभिनंदन केले
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव सर यांनी केले तर आभार श्री पाटील सर यांनी मानले. याप्रसंगी पलूस तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top