Sanvad News सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीस कृतीशील शाळा; तर मानसिंग हाके यांना कृतीशील शिक्षक पुरस्कार.

सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीस कृतीशील शाळा; तर मानसिंग हाके यांना कृतीशील शिक्षक पुरस्कार.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या भिलवडी ता.पलूस येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी या प्रशालेस "कृतीशील शाळा" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच याच प्रशालेतील श्री मानसिंग शिवाजी हाके सरांना " कृतीशील शिक्षक" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्यावतीने संस्थेच्या बाबासाहेब चितळे सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.पुणे विभागाचे विद्यमान शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत यांच्या शुभ हस्ते व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक उद्योगपती मा.गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी बोलता मा.आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले की, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा व शाळेचा पुरस्कार देऊन गौरव करणे आवश्यक आहे. पुरस्कार देऊन गौरव झाल्यामुळे शिक्षकांना नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती गिरीश चितळे यांनी पुरस्कार प्राप्त शाळा व शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करीत भविष्यात येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरे जात काम करावे.


स्वागत श्री टी. एस. पाटील सरांनी,सूत्रसंचालन श्री संजय मोरे सरांनी केले,तर आभार श्री पाटील सरांनी मानले.या कार्यक्रमाला भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव श्री संजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ.शुभांगी मन्वाचार,संभाजी माने सर, प्रा.जी.एस.साळुंखे, प्रा.सौ.मनिषा पाटील,के.डी.पाटील आदी शिक्षक बंधू भगिनीं उपस्थित होते.
To Top