Sanvad News जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये हृषिकेश मोहितेचे यश;ऑल इंडिया रँक मध्ये उत्तीर्ण

जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये हृषिकेश मोहितेचे यश;ऑल इंडिया रँक मध्ये उत्तीर्ण


जेईई ॲडव्हान्स या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक मिळवून हृषिकेश मोहिते अभियांत्रिकी क्षेत्रात सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्था आय.आय.टी.मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.संजय घोडावत आय.आय.टी.अकॅडमी अतिग्रे मध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
हृषिकेश मोहिते याचे प्राथमिक शिक्षण होली मदर स्कूल पेठवडगाव येथे, माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल किणी येथे सेमी इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे.गणित,विज्ञान,सामान्यज्ञान व स्पर्धा परीक्षेचा पाया किणी हायस्कूलमध्ये घातला गेला आहे त्यात त्याच्या शिक्षकांचा वाटा ही मोलाचा आहे.चौथी व सातवी मध्ये त्यास स्कॉलरशिप प्राप्त आहे.
वक्तृत्व स्पर्धा ,सामान्य ज्ञान,स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शनामध्ये त्याचा राज्यस्तरीय सहभाग असून त्यात त्याने विशेष कामगिरी केली आहे.किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (KYPY) ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा,
बिट्स पिलानी प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.त्यानेजेईई एडवांस मध्ये ऑल इंडिया रँक-1058 प्राप्त केली आहे.भविष्यात त्यास आयआयटी बॉम्बे येथे इरो स्पेसमध्ये इंजिनीअरिंग करून संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करण्याची इच्छा आहे.
त्याची आई सौ.प्रतिभा मोहिते व वडील विठ्ठल मोहिते हे दोघे माध्यमिक शिक्षक आहेत.मोहित्यांचे वडगांव हे त्यांचे मूळ गांव असून सध्या ते सांगली येथे निवासी आहेत.या यशाबद्दल हृषिकेश मोहिते याचे कौतुक होत आहे.
To Top