सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ यांच्यावतीने आयोजित स्वयम् रचित काव्यवाचन प्रतियोगिता मध्ये चाँद उर्दू स्कूल मिरजची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी रोहा अक्रम दर्यावर्दी हिने स्वरचित कविता वाचन मध्ये सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
सदरची स्पर्धा झूम ॲप द्वारे संपन्न झाली होती. या स्पर्धेसाठी चाँद उर्दू स्कूल व हायस्कूलच्या अनेक बाल कवी कवयित्रींनी उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणारी कु. रोहा अक्रम दर्यावर्दी व वर्गशिक्षिका नाझिया शरीकमसलत यांचे संस्थाअध्यक्ष मा.हाजी शफी चाँद बागवान व मुख्याध्यापिका तबस्सुम पालेगार चाँद उर्दू स्कूल व हायस्कूलचे अभिनंदन होत आहे.
स्वयम् रचित काव्य वाचन स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे
लहान गट (5 वी ते 7 वी)
प्रथम क्रमांक: रोहा अक्रम दर्यावर्दी -७ वी -चांद उर्दू स्कूल मिरज (कविता- देश हमारा)
द्वितीय क्रमांक: श्रेया जोशी- ६वी -आयडल स्मार्ट स्कूल मिरज (कविता -हिंदी)
तृतीय क्रमांक: ओंकार चंद्रकांत माने -६ वी -श्री .महांकाली हायस्कुल कवठेमहांकाळ (कविता -पर्यावरण)
उत्तेजनार्थ
(1) कल्याणी राजू दबडे -६ वी (कविता -पेड)
(2) शर्या जाधव -७ वी हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळी ता पलूस
मोठा गट ( 8वी ते 10वी)
प्रथम क्रमांक: प्रतिभा अर्जुन निकम -१० वी -श्री. महांकाली हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज कवठेमहांकाळ (कविता -कोरोना को हम करेंगे परास्त)
द्वितीय क्रमांक: श्रावणी संतोष कुमार जाधव -९ वी- आदर्श बाल मंदिर इस्लामपूर (कविता- लोकडाउन के दिनो मे बदला जीवन)
तृतीय क्रमांक: स्वराली दत्तात्रय मोहिते -८ वी- श्री. सिद्धनाथ विद्यालय आरवडे (कविता -पिता)
उत्तेजनार्थ
1) अनुष्का संभाजी साळुंखे - १० वी- छत्रपती विद्यालय दुधोंडी ता. पलूस (कविता -राष्ट्रभाषा हिंदी)
2) पूनम करीम मुलाणी -९ वी- श्री.अंबिका विद्यालय कणदूर (कविता -मेरी पाठशाला)