शाळेत शिकणारी मुलांना घरकामात इंटरेस्ट नसतो,अभ्यास टी. व्ही.सोडून इकडची काडी तिकडे करत नाहीत..अशी घराघरांत ओरड असतेच.पण पालकांचे हे मत विद्यार्थ्यांनीच खोडून काढीत घरकामाचा ताबा घेत,घर व परिसराची हटके अशी स्वच्छता करून हम बी कुछ कम नहीं हे सिद्ध केलं.भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लीश प्रायमरी अँड हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त हा प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.पारंपारिक पद्धतीने केवळ महापुरुषां च्या प्रतिमेचे पूजन करणे,भाषणे करणे किंवा ऐकणे असे साचेबंद कार्यक्रम राबविले जातात.पण शाळेने महापुरुषांचा एखादा विचार,मूल्य मुलांनी प्रत्यक्ष आचरणात आणवा,व्यावहारिक जीवनात त्याचा उपयोग करावा या हेतूने वर्गाच्या व्हॉटसअप ग्रुप वरून आवाहन केले.विद्यार्थ्यांनी घर,परिसर,परसबाग आदींची स्वच्छता करून त्याचे व्हिडिओ परत पाठवायचे.
विद्यार्थी वर्गाकडून उस्फूर्तपणे या उपक्रमास प्रतिसाद मिळाला.तसेच स्वच्छतेच्या माध्यमातून एक चांगला संस्कार बालमनावर झाला.दिवसभर आलेल्या अनुभवांचे विद्यार्थ्यांनी लेखन केले.आपले आईवडील,घरची मंडळी दिवसभर किती लहानसहान कामे पूर्ण करण्यासाठी किती कष्ट करत असतात याचा अनुभव चिमुकल्यांनी घेतला. तसेच आपण नियमित पणे घर,परिसर,सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करण्याचा संकल्प ही विद्यार्थ्यांनी केला आहे.विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमांचे रेखाटन केले.तसेच भाषणे देखील सादर केली.
मुख्याध्यापिका विद्या टोणपे यांच्या सह सौ.रेणुका रोटिथोर,सौ.मनिषा बाबर,सौ. वर्षा कदम, सौ.अश्विनी महींद , सौ संगिता चौगुले,सौ.सारीका पाटील, श्री.सुनील ऐतवडे आदींनी या उपक्रमाचे नियोजन केले.