Sanvad News मौलाना आझाद निवासी शाळेतील शिक्षक रियाज बागवान यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार.

मौलाना आझाद निवासी शाळेतील शिक्षक रियाज बागवान यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार.



श्री रामराव विद्यामंदिर जत येथे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने कृतिशील शिक्षक पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विभागाचे विद्यमान शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मौलाना अबूल कलाम आझाद निवासी शाळा रामपूर जत येथील सहा. शिक्षक श्री रियाज बागवान यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला. शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाच पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना या पुरस्कारने नवी ऊर्जा मिळेल तसेच भविष्यात शिक्षकांच्या समस्या सोडवन्या साठी आपण तत्पर हजर राहू. असेही श्री सावंत सर यानी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री कोळी यांनी केले तर आभार श्री पाटील सर यांनी मानले. या प्रसंगी जत तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
To Top