संत तुकाराम विद्यालय हिवरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय गुळवंची, जि. प. शाळा हिवरे यांच्या सयुंक्त विद्यमाने म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची ऑनलाईन जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात हिवरे हायस्कूल चे चेअरमन मा. सिद्राम शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये पाचवी ते दहावी च्या विध्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. केंद्र प्रमुख नदाफ सर, हिवरे हायस्कूल चे मुख्याध्यापक बाबासो बंडगर सर, गुळवंची हायस्कूल चे मुख्याध्यापक खुटाळे सर, बसवराज येलगार, अरुण वाघमारे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पारसे सर यांनी केले तर सूत्रसंचालन पाटील सर आणि तांबोळी सर यांनी केले. आभारप्रदर्शन बबन पवार यांनी केले. कार्यक्रमांस गुरव सर बाबर सर, सरगर सर, घोडके मॅडम, चंदू पवार, राजू फोंडे, यादव, जोतिराम कांबळे, दोन्ही गावातील बहुसंख्य पालक उपस्थित होते.