सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सहकारी रुग्णालय संचलित कोविड सेंटरची गरज ओळखून आज तासगाव तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून ऑक्सीजन मशीन प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. अमोल शिंदे म्हणाले, कोवीड महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षणाबरोबरच चेक पोस्ट ड्युटी, कोरोना नियंत्रण कक्षातील ड्युटी,सर्वेक्षण इत्यादी कामाबरोबरच रुग्णांसाठी सेंटरची उभारणी करून आमचे शिक्षक आपत्ती काळात प्रचंड मोठे समाजभान जपत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या संघटनेच्या तासगाव तालुक्यातील तरुण शिक्षकांनी वर्गणी काढून ऑक्सीजन मशीन आज प्रदान केले आहे.
याप्रसंगी रुग्णालयाचे चेअरमन राजेंद्र कांबळे, शिक्षक बँकेचे संचालक तुकाराम गायकवाड, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास चव्हाण, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी, तासगाव तालुका अध्यक्ष महादेव जंगम, शिक्षक समितीचे पलुस तालुका अध्यक्ष प्रदीप मोकाशी, तासगाव तालुका अध्यक्ष श्रीकांत शिंदे, मुकुंद पंडित, प्रकाश कुचकर नवनाथ पोळ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.