Sanvad News प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांना सूचना-मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांना सूचना-मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी

प्राथमिक शिक्षक समितीचा पाठपुराव्याला यश-जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड.


जिल्हा परिषदेच्या  स्तरावरील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आदेश सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीसो जितेंद्र डुडी यांनी शिक्षक संघटना बैठकीत विभाग प्रमुखांना दिली असल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड यांनी दिली.
         जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष मा.संग्रामसिंह देशमुख, जि.प.अध्यक्षा मा.प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष मा.शिवाजी डोंगरे, शिक्षण सभापती मा.आशाताई पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीधिकारीसो, मुख्य लेखाधिकारीसो, प्राथमिक शिक्षणाधिकारीसो यांना वेळोवेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने २१ जुलै ते १६ सप्टेंबर २०२० या कालावधीत सोळा निवेदनाद्वारे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी लक्ष्य वेधून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील यांना जिल्हा परिषद गटनेते शरद भाऊ लाड यांच्या समवेत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड,किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्यामुळे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी बैठक घेण्यात येईल असेही सांगितले. त्याअनुशंगाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात संघटना प्रतिनिधी ची संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये आक्टोबर अखेर शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणं सोडविण्यासाठी सूचनाही संबंधित खातेप्रमुख यांना दिल्या. त्यामुळे आंतरजिल्हा बदली शिक्षकांना जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २००५ पुर्वी ज्या शिक्षकांच्या अशंदान कपात करण्यात आली आहे त्याबाबत संबंधित शिक्षकांच्या प्रा.फंड खात्यावर वसूल रक्कम वर्ग करणे, DCPS शिक्षकांना हिशोब चिट्ट्या देण्यात येणार असून त्यानंतर त्यांना NPS पेन्शनकडे वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येईल, विषय शिक्षक यांना शासन परिपत्रकानुसार ग्रेड वेतन लागू करणे, मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख-विस्तार अधिकारी पदोन्नती, प.स.मिरज शिक्षण विभागाकडील ऑनलाईन-ऑफलाईन पगार तफावत दुरुस्ती करणे, तालुकास्तरावर सातव्या वेतन आयोग सेवा पुस्तक वेतन पडताळणी कॅप लावणे, भ.नि.नि.स्लिपावर वारस नोंदीची स्लीप देणे आणि फॅब्रिक्स वेबसाईट वर स्लीपा उपलब्ध करुन देणे यासह विविध विषयावर दोन तास चर्चा करुन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे बाबासाहेब लाड यांनी सांगितले.
         या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारीसो जितेंद्र डुडी, लेखाधिकारीसो डॉ.राजेंद्र गाडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारीसो राहूल गावडे, शिक्षणाधिकारीसो सुनंदा वाखारे, उपशिक्षणाधिकारीसो महेश धोत्रे, विस्तार अधिकारीसो प्रकाश चव्हाण संघटना प्रतिनिधी म्हणून शिक्षक समितीचे सयाजी पाटील, पदवीधर संघटना तुकाराम सावंत, शिक्षक संघ मुकुंद सुर्यवंशी, अविनाश गुरव, शिक्षक भारती महेश शरनाथे, मागासवर्गीय संघटना संतोष कदम, जुनी पेन्शन संघटन अमोल शिंदे, अखिल शिक्षक संघ भानुदास चव्हाण, पुरोगामी संघटना दिवाणजी देशमुख यांनी चर्चेत सहभागी होते.
        यावेळी शिक्षक नेते किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे, कोषाध्यक्ष माणिक पाटील, कार्याध्यक्ष सतिश पाटील, राज्य संघटक सयाजी पाटील, शशिकांत भागवत,  शिक्षक बॅऺकेचे अध्यक्ष सुनील गुरव, महादेव माळी, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, बाबासाहेब आडके,  यु.टी.जाधव, श्रीकांत माळी, सदाशिव पाटील, रमेश पाटील, श्रेणिक चौगुले, शिवाजी पवार, हरीभाऊ गावडे, राजाराम सावंत, राजाराम शिंदे, कुबेर कुंभार, सुरेश नरुटे, श्रीकांत शिंदे, प्रताप सावंत, सुरेश पाटील, दिपक कोळी, वसंतराव नागरगोजे, प्रसिध्दीप्रमुख विनोदकुमार पाटील, विकास चौगुले आदी शिक्षक समितीचे मान्यवर पदाधिकारीही उपस्थित होते.
To Top