तिसरे बालकुमार अभिव्यक्ती साहित्य संमेलन दिनांक २५ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले.देशिंग हरोली येथील अभिव्यक्ती प्रतिष्ठान मार्फत हे साहित्य संमेलन घेण्यात आले. कै.सुर्यकांत पाटील यांचे स्मरणार्थ हे संमेलन घेतले जाते .या संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे.कोरोना परिस्थितीमुळे हे संमेलन अभिव्यक्ती प्रतिष्ठान देशिंग हरोलीच्या फेसबुक पेजवर ऑनलाईन पद्धतीने हे संमेलन संपन्न झाले.
बालकुमारअभिव्यक्ती साहित्य संमेलनाच्या
उद्घाटक म्हणून प्रख्यात प्रकाशिका व महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणेच्या कोषाध्यक्ष सौ.सुनीताराजे पवार होत्या.उद्घाटन प्रसंगी म्हणून त्या म्हणाल्या की, संस्कार पेरावे लागतात.कला संस्कारीत व्हाव्या लागतात.साहित्य,वाचन यांचे संस्कार घडावे लागतात.
म्हणून मुलांनी वाचले पाहिजे.एक पुस्तक आयुष्याला दिशा देऊ शकतं.माणूस समजून घ्यायचा असेल तर चांगलं वाचलं पाहिजे .साहित्य आत्मबळ देतं.मुलांच्या मध्ये एकांत पेलण्याची ताकद चांगले साहित्य देते.
संमेलनाध्यक्ष पदी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील प्रसिद्ध कवी अनंत कदम उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात बालकुमार साहित्य चळवळींची गरज व्यक्त केली.साहित्य जगण्याला आधार देते.आनंद निर्माण करते.म्हणून विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे काळाबरोबर चालावे.असे विचार त्यांनी व्यक्त केले.
उद्घाटन सञानंतर बालकविसंमेलन झाले.या कविसंमेलनाची अध्यक्ष बालकवयिञी कु.लक्ष्मी बनसोडे होती.तिच्या अध्यक्षतेखाली पंधरा निमंञित विद्यार्थ्यांनी कवितवाचन केले.सूञसंचालन उदयनराणा पाटील,माहेश्वरी देसाई,श्लोक चव्हाण ,राजवर्धन पाटील,सिद्धी पाटील,आर्या पाटील,अनया पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत पृथ्वीराज पाटील,प्रास्ताविक कवयिञी मनीषा पाटील व अतिथी परिचय सौ.सीमा निकम यांनी करुन दिला.आभार सौ.मानसी पाटील यांनी मानले.
कोरोना महामारी मुळे हे संमेलन अभिव्यक्ती प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर प्रसारित झाले .जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.त्याचे विशेष कौतुक होत आहे.लिहिणा-या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी,व्यासपीठ मिळावे .या हेतूने हे संमेलन घेतले जाते. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मनीषा पाटील,सीमा निकम,ॲड.पृथ्वीराज पाटील ,राहुल निकम व प्रा.एस् ,एस्.पाटील विशेष प्रयत्न केले .