जिल्ह्याच्या साहित्य चळवळीतील पहिलाच उपक्रम..
देशिंग हरोली येथील अभिव्यक्ती प्रतिष्ठान मार्फत २५ सप्टेंबर रोजी तिस-या बालकुमार अभिव्यक्ती साहित्य साहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठान च्या अध्यक्षा कवयित्री मनीषा पाटील यांनी दिली.सामाजिक व साहित्यिक चळवळीचे मार्गदर्शक स्वर्गिय सुर्यकांत पाटील यांचे स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे.
यावर्षी बालकुमार अभिव्यक्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रख्यात प्रकाशिका व महाराष्ट्र साहित्य परिषद ,पुणेच्या कोषाध्यक्ष सौ.सुनीताराजे पवार आहेत . लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील प्रसिद्ध कवी अनंत कदम यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न होईल. कविसंमेलनाची अध्यक्ष म्हणून बालकवयिञी कु.लक्ष्मी बनसोडे हिची निवड करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कवयिञी मनीषा पाटील म्हणाल्या की,कोरोना महामारी मुळे हे संमेलन अभिव्यक्ती प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर सकाळी ठीक १०वा. प्रसारित होणार आहे.आॕनलाईन साहित्य संमेलन असल्यामुळे दोन सञामध्ये संमेलन घेतले जाईल.उद्घाटन सञानंतर विद्यार्थी कविसंमेलन संपन्न होईल. ऑनलाईन साहित्य संमेलन हा सांगली जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.त्याचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.लिहिणा-या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी,व्यासपीठ मिळावे .या हेतूने हे संमेलन घेतले जात आहे.संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मनीषा पाटील,सीमा निकम,ॲड.पृथ्वीराज पाटील व प्रा.एस् ,एस्.पाटील विशेष प्रयत्न घेत आहेत.