Sanvad News सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची ऐतिहासिक कामगिरी. प्रशालेची ईशा साळुंखे राज्यात प्रथम.

सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची ऐतिहासिक कामगिरी. प्रशालेची ईशा साळुंखे राज्यात प्रथम.

तब्बल १६ विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत.


विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उद्देशाने गेली २० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून विटे येथील भारतमाता ज्ञानपीठची सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशाला ओळखली जाते.विविध सहशालेय उपक्रमासोबत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला बसविण्यात व त्यांची तयारी करून घेण्यास प्रशाला नेहमीच तप्तर असते.या शाळेचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात निपुण कामगिरी करताना दिसून येत आहेत.
    भारती विद्यापीठ पूणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष सन २०१९/२० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत प्रशालेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु.ईशा विनायक साळुंखे हिने राज्यात प्रथम येत ऐतिहासिक क्षणाला गवसणी घातली.अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षा आणि सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची चमकदार कामगिरी असे समीकरणच झाले आहे.
   तस पाहिले तर प्रशालेचे विद्यार्थी दरवर्षी राज्याच्या यादीत चमकत असतात.या वर्षी ईशा ने या यादीत येत पुन्हा एकदा सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेचा पताका डौलाने फडकविला.
या परीक्षेत विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी करत यशाला गवसणी घातली आहे . यामध्ये इयत्ता चौथीच्या वर्गामधील शरयू योगेश्वर मेटकरी, अनुष्का पंढरीनाथ पवार, पाचवीच्या वर्गामधील सोनिया जितेंद्र जाधव, श्रीया गुरुनाथ सूर्यवंशी, इयत्ता सहावीच्या वर्गामधील ईशा विनायक साळुंखे, गौरजा गजानन रंगाटे, श्रुष्टी महेश साळुंखे, इयत्ता सातवीच्या वर्गामधील राजलक्ष्मी धनंजय फाळके, इयत्ता आठवीच्या वर्गातील श्रुती संजय नवगिरे, हर्षवर्धन योगेश्वर मेटकरी,इयत्ता नववीच्या वर्गामधील सानिका धनाजी पाटील,अभयराज काकासो तामखडे आणि इयत्ता दहावीच्या वर्गामधील अनिता भीमराव मोटे व पल्लवी रामचंद्र जानकर या विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
या विद्यार्थ्यांच्या भरीव कामगिरीबद्दल भारती विद्यापीठाच्या प्रमुख श्रीमती विजयमाला कदम ( वहीनीसाहेब ) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सोबतच प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर ,कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांच्यासोबत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याही कामाचे कौतुक केले.
 प्रशालेने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक रघुराज मेटकरी, अध्यक्षा रेखा शेंडगे,प्राचार्या वैशाली कोळेकर,कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
  यशस्वी विद्यार्थ्यांना तोसीम शिकलगार, अभिजित निरगुडे,तात्यासो शेंडगे,राजू गारोळे,शंकर कांबळे,प्रतिभा रावताळे,स्वप्नाली भिंगारदेवे, अंजली पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
To Top