Sanvad News नवनाथ कदम यांच्याकडून गुळवंची विद्यालयाला शैक्षणिक साहित्य प्रदान

नवनाथ कदम यांच्याकडून गुळवंची विद्यालयाला शैक्षणिक साहित्य प्रदान



कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुद्धा गुळवंची येथील भारतरत्न   डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय गुळवंची शाळेत ऑनलाईन  शिक्षण चालू ठेवले आहे . अशा परिस्थीतीत समाजाचे आपण काहीतरी  देणे लागतो या उदात्त भावनेने कोसारी गावचे युवक नवनाथ कदम(मुंबई पोलीस) यांनी  इयत्ता दहावी मध्ये  शिकणाऱ्या काही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे  वाटप केले . तसेच गावातील इतर दानशूर व्यक्तींनी सुद्धा शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्याचे वाटप करावे असे आवाहन नवनाथ कदम यांनी केले. मुख्याध्यापक दिनकर खुटाळे यांनी विद्यालयामधील सर्व विध्यार्थ्यानी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.  कार्यक्रमासाठी बसवराज येलगार सर, जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक संघ सांगली. सामाजिक कार्यकर्ते  दिगंबर गोरे, रावसाहेब खरात, संभाजी खटके,  गुळवंची विद्यालयाचे गुरव सर, बाबर सर, सरगर सर, घोडके मॅडम,  राजेंद्र फोंडे, चंदू पवार  इत्यादी  मान्यवर उपस्थित होते.
To Top