Sanvad News शौर्य कटारे याचा वाढदिवस गोविंद वृध्दाश्रमात साजरा;आश्रमाला दिले जीवनावश्यक साहित्य

शौर्य कटारे याचा वाढदिवस गोविंद वृध्दाश्रमात साजरा;आश्रमाला दिले जीवनावश्यक साहित्य



महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी आपला चिरंजीव शौर्य कटारे याचा ७ वा वाढदिवस सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून साजरा केला. येळावी ता.तासगाव येथील गोविंद वृध्दाश्रमात हा वाढदिवस करण्यात आला.कोरोना महामारीचे संकट तुमच्या आमच्या घराच्या दरवाजां वर उभे ठाकले असताना आपण मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करणे योग्य नाही. चिमुकल्या शौर्य ने ही आईवडिलांच्या या विधायक निर्णयाला
होकार दिला. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्त घरी कोणताही कार्यक्रम न करता आश्रमातच केक कापून वाढदिवस साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत आश्रमातील उपस्थित महिलांनी औक्षण करून शौर्य ला शुभेच्छा दिल्या.




वाढदिवसासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाला फाटा देत त्यातून धान्य व जीवनावश्यक साहित्य आश्रमाला भेट दिले.संस्थेचे चेअरमन श्री.विठ्ठल राजाराम पाटील व व्यवस्थापिका सौ.अलका विठ्ठल पाटील यांनी या मदतीचा स्विकार केला.बाळासाहेब कटारे व सौ.आश्विनी कटारे या दांपत्याचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.शिक्षक नेते बाळासाहेब कटारे यांनी आपल्या चिरंजी वाच्या वाढदिवसा निमित्त राबाविलेल्या या विधायक उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.


To Top