तासगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी मध्ये प्रत्यक्ष पगारातून झालेली कपात रक्कम व भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर झालेली जमा रक्कम यामध्ये तफावत आहे. अनेक शिक्षकांच्या पगारातून जादा रक्कम कपात होऊन सुद्धा प्रत्यक्ष जमा रक्कम कमी दिसत आहे. याची जिल्हा परिषदेकडे चौकशी केली असता पंचायत समिती तासगाव कडून पाठवलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या शेड्युलमध्ये त्रुटी असल्याचे सांगितले त्यामुळे अशाप्रकारे प्रत्यक्ष कपात व जमा रक्कम यामध्ये तफावत असणाऱ्या शिक्षकांच्या शेड्युल मध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने गट विकास अधिकारी बापट मॅडम यांच्याकडे करण्यात आली.
ज्या शिक्षकांच्या अशा प्रकारे तफावती आहेत अशा शिक्षकांनी पंचायत समिती शिक्षण विभाग अथवा शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्रुटी बाबतचा पुरावा देण्याचे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले.
तसेच सध्या प्राथमिक शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये होत आहेत त्यासाठी तासगाव पंचायत समितीने युनियन बँकेमध्ये खाते काढले आहे, परंतु युनियन बँकेतील स्टाफ पगार वर्ग करणे मध्ये दिरंगाई करत असल्याबाबतची ही चर्चा झाली त्याबाबत बँक व्यवस्थापनाशी चर्चा करू अथवा पगारासाठी चे खाते इतर बँकेमध्ये काढू अशी चर्चा झाली.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव, तालुकाध्यक्ष शब्बीर तांबोळी, रघुनाथ थोरात, नंदकुमार खराडे, आनंदा उतळे, राजाराम कदम, अण्णासाहेब गायकवाड , रमेश हजारे, रणजीत नाटेकर, सर्फराज मुल्ला, विष्णू भोसले, राजाराम नलवडे यांच्यासह शिक्षक संघाचे सभासद उपस्थित होते.