विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणेबाबत श्री.विनायक शिंदे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मा.राहुल गावडे साहेब,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना निवेदन दिले.
यावेळी बोलताना श्री.विनायकराव शिंदे यांनी सांगली जिल्ह्यातील विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणेबाबत श्री.राहुल गावडे साहेब यांच्या बरोबर चर्चा करताना हा फार दिवसांचा प्रश्न असून प्रशासनाने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून जे जे पुरावे आवश्यक आहेत ते सादर केले आहेत, राज्यातील 18 जिल्ह्यातील जिल्हा परिषद वेतनश्रेणी लागू करते तर आपल्या जिल्हा परिषद वेळ का लावून सदर शिक्षक बंधू-भगिनी यांचेवर अन्याय करत आहे अशी आमची भावना आहे,तरी आपण याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन हा विषय तत्काळ मार्गी लावून विषय शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी श्री.राहुल गावडे साहेब यांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लवकरच योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.तसेच अप्रशिक्षित शिक्षकांचा एकूण कालावधी वरीष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरणे बाबत, तसेच विषय शिक्षक म्हणून नवनियुक्त शिक्षणसेवकांना 8000 रूपये मानधन मिळणेबाबतही चर्चा करण्यात आली याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे श्री.गावडे साहेब यांनी सांगितले आहे.
यावेळी विनायक शिंदे जिल्हाध्यक्ष, अविनाश गुरव सरचिटणीस,शब्बीर तांबोळी अध्यक्ष तासगाव तालुका, मोहन पवार सरचिटणीस शिराळा, विठ्ठल पाटील व इतर उपस्थित होते.