भिलवडी गावचे सुपुत्र दिलीप भरमा रांजणे यांची कुंडलच्या गांधी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी निवड झाली आहे.गांधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरुण आण्णा लाड यांनी ही निवड जाहीर केली.दिलीप रांजणे हे सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असतात.त्यांनी आजपर्यंत शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात सेवा बजावली आहे त्यांच्या कामाचा अनुभव बघून , त्यांच्या कार्याची दखल घेऊन कुंडल येथील गांधी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे.रांजणे यांच्या अनुभवाचा गांधी एज्युकेशन सोसायटीला नक्कीच फायदा होईल यात शंकाच नाही.
यावेळी दिलीप रांजणे म्हणाले मी आजपर्यंत शिक्षक म्हणून काम पाहिले आहे इथून पुढे माझ्या कामाचा अनुभव मी गांधी एज्युकेशन सोसायटी च्या उन्नती साठी घालावीन दिलेल्या संधीचे सोने करिन व प्रमाणिकपणे काम करिन .
निवडीबद्दल रांजणे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.