Sanvad News कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी बाजीराव प्रज्ञावंत यांची फेरनिवड.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी बाजीराव प्रज्ञावंत यांची फेरनिवड.

 
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कोल्हापूर विभागीय अध्यक्षपदी बाजीराव प्रज्ञावंत यांची फेरनिवड करण्यात आली. 
शिक्षक संघटना व कास्ट्राईब कर्मचारी महासंघ वाढीसाठी सांगली जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांच्या निवडीचे आदेश राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे साहेब यांनी नुकतेच दिले. 
या निवडीनंतर राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी व शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, जिल्हा सचिव बाबासाहेब माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. व एक सामाजिक जाणीव ठेवून सर्व शिक्षक कर्मचारी बांधवांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मागासवर्गीय व इतर शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी, न्याय मागण्यांसाठी शासन दरबारी लढणारी कास्ट्राईब शिक्षक संघटना असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी यामध्ये सामील व्हावे व आपल्या प्रश्नांबाबत संपर्क साधावा असे आवाहन बाजीराव प्रज्ञावंत यांनी केले.
याप्रसंगी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सचिव रमेश सोनवणे, उपाध्यक्ष शिवाजी जोशी आदित्य तिरमारे,आदी  उपस्थित होते.
To Top