नागठाणे ता.पलूस येथील नागेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण उर्फ कुमार शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नगरसेविका कल्पना कोळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या सर्व संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध झाली होती.
सचिवपदी काशिंनाथ शिंदे यांची तर संचालक पदी दिलीपआप्पा कुलकर्णी,आप्पासाहेब सुर्यवंशी, भिमराव पाटील,प्रभाकर कुलकर्णी,भिकाजी सांळुखे पाटील, रामराव मोडे सर, यांची निवड सर्वानुमते झाली. कायदेशीर सल्लागार पदी अॅड अशोकराव येडेकर पाटील यांची निवड करण्यात आली. प्रमूख पाहुण्याच्या हस्ते दिपप्रजवलन
करण्यात आले.श्रंदाजलीचा ठराव भिकाजी सांळुखे पाटील यांनी मांडला.सभेच्या अध्यक्षस्थानी दिलीप कुलकर्णी होते.स्वागत व प्रास्तावीक अॅड. अशोक येडेकर यांनी केले.वार्षिक सभेच्या विषय पत्रकेवरील सर्व विषय सर्वामते मंजुर करणेत आले. कल्पना कोळेकर व कुमारदादा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले .या सभेस पंढरीनाथ जाधव,मायाप्पा ढाळे,अशोक शिदे,कोळेकर साहेब रघुनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थीत होते. आभार रामराव मोडे सर यांनी मानले.