बुरुंगवाडी ता. पलूस येथील सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडी येथे १५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन उत्साहात संपन्न झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.या उपक्रमास विद्यालयातील विद्यार्थी व पालक वर्गाकडून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.सध्या शालेय कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने सर्व उपक्रमही ऑनलाईन सूचना देऊन राबविले जातात.
वर्गनिहाय असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व्हाटस्आप ग्रुप वरून या उपक्रमाबाबत सूचना देण्यात आल्या.मुलांनी घरात थोर महापुरुषांची चरित्रे,प्रेरणादायी गोष्टी आदी पुस्तकांचे वाचन केले.मुलांनी पुस्तकाचे नाव,लेखकाचे नाव, वाचलेल्या पुस्तकातून नेमकी काय प्रेरणा किंवा माहिती मिळाली याबाबत वाहिमध्ये सारांशरूपाने लेखन केले.एक मिनिट कालावधीचा व्हिडिओ ही शाळेच्या ग्रुप वर पाठविला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाताच्या स्वच्छतेचे महत्व सर्वांनाच माहित आहे.शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई,वडील,तसेच कुटुंबातील सदस्यांसोबत शासनाच्या आरोग्य विभागाने निर्धारित केलेल्या पद्धतीनुसार हात धुतले.या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ बनवून शाळेच्या ग्रुप वर पाठविण्यात आला. या उपक्रमात शाळेच्या पटावर असणारे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी झाले.
संस्थेचे अध्यक्ष सुनिल(बापू )जाधव व कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने या उपक्रमाचे नियोजन केले.