Sanvad News पलूस मदरसा 'डॉ .झाकिर हुसेन हायस्कूल पलूस मध्ये ऑनलाइन वाचन प्रेरणा दिन साजरा.

पलूस मदरसा 'डॉ .झाकिर हुसेन हायस्कूल पलूस मध्ये ऑनलाइन वाचन प्रेरणा दिन साजरा.



     डॉ .झाकिर हुसेन हायस्कूल मध्ये 15 ऑक्टोबर भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
    शाळेच्या मुख्याध्यापक आलीम शेख सर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले त्यानंतर कुमारी आर्शिया युसूफ शेख व माही शेख या विद्यार्थिनीने ए.पी.जे कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकाचे पुस्तक परिचय करून देण्याचा खूप छान प्रयत्न केले तसेच रिजवान मुल्ला सकैय्या मुल्ला रिहान निपानीकर  व तैय्यब जमादार  या विद्यार्थ्यांनी अवांतर वाचलेल्या पुस्तकांची माहिती व सारांश सांगितले.


    कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाबासो नदाफ सर या शिक्षिकेने केले कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.


To Top