चाँद उर्दू स्कूलमध्ये 15 ऑक्टोबर भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. पालेगार मॅडम यांनी स्वागत व प्रस्ताविक केले त्यानंतर कुमारी अल्मिरा जाफर व जन्नत काजी या विद्यार्थिनीने ए.पी.जे कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकाचे पुस्तक परिचय करून देण्याचा खूप छान प्रयत्न केले तसेच खदिजा सय्यद अकसा घुडीमार सफीना शेख युसुफ माणिक भाई उजमा दानवडे फाईदा पठाण व सायमा मुल्ला या विद्यार्थ्यांनी अवांतर वाचलेल्या पुस्तकांची माहिती व सारांश सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समीरा शरीकमसलत या शिक्षिकेने केले कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.