मे.बी.जी.चितळे डेअरी च्या वतीने भिलवडी शिक्षण संस्थेत कार्यरत असणाऱ्या सेवकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व चितळे डेअरी चे संचालक विश्वास चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली. संस्थेत कार्यरत असणाऱ्या सेवकांच्या आरोग्याच्या काळजीच्या हेतूने ही तपासणी करण्यात आली.संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालय, सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,इंग्लिश मिडीयम स्कूल,इंग्लिश प्रायमरी हायस्कूल,खाजगी मराठी प्राथमिक शाळा,डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी या
विविध शाखेमध्ये कार्यरत असणाऱ्या
११४ शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.
संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी,मानसिंग हाके, प्राचार्य डॉ.श्रीकांत चव्हाण,सौ.शुभांगी मन्वाचार,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी आदींसह सर्वांनी विभागनिहाय या उपक्रमाचे संयोजन केले.